रवि ढुमणे, वणी: ऐन दिवाळीच्या दिवशी जिकडेतिकडे जल्लोष केला जात असतानाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका असलेल्या रोहिणी मोहितकर यांचा मुलगा स्वर्ण याने आग्रह करून वात्सव स्वीकारीत दिवाळीच्या दिवशी घरी राजमाता जिजाऊ ,आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिवर्तनवादी वाटचालीस सुरुवात केली.
अवघ्या ७ वर्षाचा स्वर्ण या वयात इतर मुलांचा कल विविध प्रकारच्या गोष्टीकडे असतो. मात्र हा थोडा निराळाच आहे. घरात पूर्वीपासून चालत आलेल्या धर्मीकतेला बगल देत त्याने थोरांचे विचार व त्यांचे कार्य यावर लक्ष केंद्रित करून वाटचालीस सुरुवात केली.
या बाबतीत मुळात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असलेली स्वर्ण ची आई रोहिणी मोहितकर यांनी त्याला परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
दिवाळीचा सण जिकडेतिकडे फटाक्यांची आतिषबाजी त्यात या चिमुकल्याने कोणताही जल्लोष न करता घरी राजमाता जिजाऊ, व शिक्षणाची देवता आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिवाळी साजरी केली. सणासुदीला मुलांना वेगळीच ओढ असते परंतु यात त्याने थोरांच्या विचारांनी दिवाळी साजरी केली आहे. यानिमित्ताने वणी बहुगुणीच्या वतीने या चिमुकल्याला सलाम ! व परिवर्तन वादी विचारांच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा !
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.