महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेत दिवाळी निमित्त सेलिब्रेशन

कर्मचाऱ्यांना 800 किलो मिठाई आणि 600 वस्त्रांचे वाटप

बहुगुणी डेस्क, वणी: महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरचे चेअरमन पांडुरंग आंबटकर यांच्या हस्ते दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संस्थेअंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी चेअरमन सरांनी सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई आणि वस्त्रांचे वाटप करून उत्सवाचे औचित्य साधले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या उपक्रमांतर्गत सावित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसी, वणी, मॅकरून्स स्टुडंट्स अकॅडमी, वणी आणि मॅकरून्स आयटीआय, वणी येथील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रितपणे 800 किलो मिठाई आणि 600 वस्त्रे वाटप करण्यात आली.

या निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या चेअरमन सरांचे मनःपूर्वक आभार मानले. दिवाळीच्या आनंदसोहळ्यात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. संस्थेने प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करत सामाजिक बांधिलकी जपली आहे

Comments are closed.