श्री जैताई मंदिरात दिवाळी पहाट कीर्तनाचे आयोजन

धनत्रयोदशीला ह.भ.प. रामेश्वरजी खोडे महाराज करतील प्रबोधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लोकआग्रहास्तव याही वर्षी दिवाळीच्या मंगलप्रसंगी वणीतील श्री जैताई मंदिरात पहाटेचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकमेव अशी ही परंपरा असून, यंदा या उपक्रमाचे हे 26 वे वर्ष आहे.

स्व. अरुण बिलोरीया व सौ. विमलताई धोटे यांच्या मातापिता दादाजी व तुळसाबाई गोहणे यांच्या स्मरणार्थ हे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमात ह.भ.प. व्यसनमुक्ती सम्राट श्री रामेश्वरजी खोडे महाराज (महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त) आपले कीर्तन सादर करणार आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या कीर्तनाचा लाभ सर्व भक्तांनी सहकुटुंब सहपरिवार घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दिनांक 18 ऑक्टोबर (धनत्रयोदशी) रोजी पहाटे 6:00 वाजता, श्री जैताई मंदिर प्रांगण, वणी येथे करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्याचे स्वागतोत्सुक आयोजक श्री जैताई देवस्थान व बिलोरीया परिवार असून, परिसरातील भाविकांमध्ये या कीर्तनाबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.