कंपनीत जात असाल तर घरी येऊ नका

घरमालकांची कर्मचारी व कामगारांना तंबी

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीत उत्तरप्रदेश येथील तीन कामगार कोरोना पोजिटिव्ह निघाल्याने मुकुटबन सह परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. २५ जुलै रोजी उत्तरप्रदेश येथून २७ कामगार खाजगी ट्रॅव्हल्स ने मुकुटबन आले. त्यातीलच तीन कामगार कोरोना पोजिटिव्ह निघाले ज्यामुळे सिमेंट कंपनीतील ३५० कामगारांना कोरटाईन करण्यात आले तर कंपनीतील १०० मीटर परिसर सील करण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागाकडून सिमेंट कंपनीतील सर्व कामगार कर्मचारी व अधिकारी यांची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे .

सिमेंट कंपनीतील कामगारामुळे कोरोनाचा शिरकाव मुकुटबनात झाल्याबरोबर सरपंच शंकर लाकडे सह हिंदू रामसेनेचे तरुण युवक गावातील प्रतिष्ठित, तरुण पत्रकार, व्यापारी व समस्त ग्रामवासी यांनी एकत्र येऊन कोरोनावर मात करण्याकरिता एकवटले आहे. मुकुटबन शहरात किरायाने राहणाऱ्या कामगार व कर्मचारी यांना घरमालकानी कंपनीत जायचे असेल तर घरी येऊ नका, अशी तंबी दिल्याने अनेक कामगार कंपनीत जात नसल्याची माहिती आहे.

मुकुटबन परिसरातील २० ते २५ गावातील ५१४ कामगार व कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या भीतीने कंपनीत जात नाही आहे. कंपनीतील तीन कोरोना पोजिटिव्ह कामगारामुळे इतरही गावात रुग्ण वाढणार नाही खबरदारी मुकुटबन सह परिसरातील गावखेडे गावतही खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाची लागण गावात होऊ नये याकरिता हिंदू रामसेनेनी एक महिन्यासाठी कंपनीतील काम बंद ठेवावे अशी तक्रार दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.