मार्डी येथे 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

लॉकडाऊन आधी पुण्यातून आला होता मार्डीत

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मार्डी येथील एका तरुणाने 22 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुपारी 3 वाजता उघडकीस आली. शुभम बंडू भासपाले (22) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार मृतक शुभम हा पुण्याला एका खासगी कंपनीत काम करीत होता. लॉकडाऊनच्या आधीत गावी परत आला होता. आज रविवारी शुभमे आई वडील शेतामध्ये गेले होते. दरम्यान शुभमचा चुलत भाऊ अविनाश चंदू भासपाले हा सुद्धा घरीच होता. दुपारी 3 वाजताचे दरम्यान शुभमच्या मित्रांनी शुभमला घराच्या बाहेरून आवाज दिला असता त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही.

शुभमच्या मित्रांनी ही बाब अविनाशला सांगितली. त्या सर्वांनी शुभमला आवाज दिला मात्र नाही मात्र त्यानंतरही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून बघितले असता त्यांना शुभमचा मृतदेह सिलिंग फॅनला लटकलेला आढळला. त्यांनी त्वरित याबाबत पोलिसांना माहिती दिली.

शुभमच्या आत्महत्तेचे कारण कळू शकले नाही. या घटनेची नोंद करण्यात आली असून याचा तपास पो. नि. जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुरेंद्र टोंगे करित आहे. शुभमने अचानक आत्महत्येचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.