आता हार्मोन्स संबंधी तपासणी व उपचार होणार वणीतच

शुगर, थॉयराईड, लठ्ठपणा व हार्मोन्स संबंधी आजारावर महिन्याच्या पहिल्या रविवारी करता येणार तपासणी.... जिल्ह्यातील एकमेव हार्मोन्स स्पेशालिस्ट डॉ. पंकज फेरवाणी, (MBBS, MD (Medicine), DNB (Endocrinology)) देणार रुग्णसेवा

बहुगुणी डेस्क, वणी: आता वणी व वरोरा परिसरातील शुगर, थॉयराईड, लठ्ठपणा व इतर हार्मोन्ससंबंधी आजारांवरील स्पेशालिस्ट वणीतच उपलब्ध होणार आहे. मुळचे वणीकर व यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव होर्मोन्स तज्ज्ञ डॉ. पंकज फेरवाणी (MBBS, MD (Medicine), DNB (Endocrinology)) हे आता दर महिन्याच्या पहिल्या रविवारी वणीत रुग्णसेवा देणार आहेत. सिंधी कॉलोनीतील दर्ग्या जवळील फेरवानी निवास येथे स. 11 ते 3 या वेळेत ते रुग्णांची तपासणी करणार आहे. सुपर स्पेशालिटी सुविधा वणीत उपलब्ध नव्हती. मात्र आता वणीतच उपचार मिळणार असल्याने रुग्णांना याचा चांगला फायदा होणार आहे. शिवाय यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैशाचीही बचत होणार आहे. 

शुगरची समस्या, मधूमेह, ब्लड प्रेशर, थॉयराईड, गर्भावस्थेतील शुगर व थॉयराईड, लठ्ठपणा, लहान मुलांमध्ये असलेला लठ्ठपणा, हाडांचा ठिसुळपणा, पीसीओडी, मासिक पाळीचे विकार, चेह-यावरील अनावश्यक केस, स्तनातून पांढरे पाणी जाणे, उंची न वाढणे, लवकर वयात येणे, पुरुषांच्या लैंगिक समस्या, पिटुईटरी ग्रंथीचे विकार, हिमोग्लोबिन व व्हिटॅमिन डी ची कमतरता, मलेरिया-डेंग्यू, सर्दी खोकला इत्यादी आजार व समस्येवर रुग्णांना तपासणी करता येणार आहे. तसेच बीपी व मधूमेह यापासून होणारे दुष्परिणामही रुग्णांना टाळता येणार आहे.

डॉ. पंकज फेरवाणी यांचा परिचय
डॉ. पंकज एम. फेरवाणी हे मुळचे वणीतील असून ते सिंधी कॉलोनीतील रहिवासी आहेत. यांनी वणीतील एसपीएम शाळेतून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नाशिक येथून MBBS चे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर (GMC) येथून MD केले. तर मुंबईतील सुप्रसिद्धी हिंदूजा हॉस्पिटल येथून त्यांनी Endocrinology या विषयात सुपर स्पेशालिटीचे शिक्षण घेतले. याशिवाय त्यांनी नागपूर व मुंबईतील विविध सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा दिली आहे. विशेष म्हणजे डॉ. पंकज हे वणीतील सिंधी समाजातील पहिले डॉक्टर आहेत.

रुग्णांना दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी 11 ते दु. 3 वेळेत तपासणीसाठी भेटता येणार आहे.
पत्ता: डॉ. फेरवाणी यांचे घर, दर्ग्याजवळ, सिंधी कॉलोनी वणी,
अधिक माहिती व नंबर लावण्यासाठी संपर्क- 9881228029, 7020719602

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!