राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. सतीश पावडे यांची नियुक्ती

संगीयसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचा निर्णय

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वर्धा: महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाटककार, नाट्य दिग्दर्शक, नाट्य संशोधक आणि नाट्यसमीक्षक डॉ. सतीश पावडे यांची मराठा सेवा संघ प्रणित संगीयसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी ही नियुक्ती केली आहे. डॉ.सतीश पावडे हे वर्धा येथील महात्मा गांधी इंटरनँशनल हिंदी युनिवर्सिटीच्या परफाँर्मिंग आर्ट्स (फिल्म एंड थिएटर स्टडीज) विभागात वरीष्ठ सहायक प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.

गेल्या 35 वर्षांपासून ते साहित्य, कला आणि सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांची आता पर्यंत नाटक, कला, चरीत्र, नाट्य संशोधन आणि नाट्यसमीक्षे विषयक 22 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी 50 नाटकांचे दिग्दर्शन आणि 15 नाटकांचे भाषांतर,, रूपांतर हि केले आहे.

मँग्नम ऑनर अवार्ड, युनेस्को क्लब्स अचिवमेंट अवार्ड, स्मिता पाटील अवार्ड, महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट नाट्यलेखन आणि नाट्यसमीक्षा पुरस्कार असे एकुण 22 पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.

श्रीलंकेच्या आशा एंड तिलीनी परफाँर्मिंग आर्ट्स अकादमीने “रिजनल थिएटर अँक्टिविटी एक्सलंस” या बहुमानाने सन्मानित केलेआहे. संगीत नाटक अकादमीच्या राष्ट्रीय रीसर्च फेलोशिपचे ही मानकरी आहेत.

या शिवाय महाराष्ट्र राज्य नाट्य सेन्सॉर बोर्ड सदस्य आणि मराठी विश्वकोषाच्या नाट्य मंडलाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. महान गायक, नट, नाट्यनिर्माता, नाट्य दिग्दर्शक संगीयसूर्य केशवराव भोसले यांच्यावरील “आधुनिक मराठी रंगभूमीचे शिल्पकार“ हा चरित्रग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.