भारत गणेशपुरे व एनएसडीची अमरावती येथे अभिनय कार्यशाळा

चला हवा येऊ द्याची टीमही करणार मार्गदर्शन... कॅमेरा फेसिंग तंत्र शिकण्याची संधी

बहुगुणी डेस्क, वणी: प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे व अंकुर वाढवे यांच्या नेतृत्वाखाली नवोदित कलावंतांसाठी अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दिनांक 2 ते 6 एप्रिल 2025 दरम्यान ललित कला भवन, अमरावती येथे आयोजीत करण्यात आली आहे. कामगार कल्याण केंद्र व एम. जे. बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मोजक्या जागा या शिबिरासाठी असल्याने आधी रजिस्ट्रेशन करणा-या कलावंतांनाच यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

काय शिकता येणार कार्यशाळेत?
या कार्यशाळेत अभिनयाचे विभिन्न प्रकार, ऑडिशन, कॅमेरा कौशल्य तसेच या क्षेत्राशी संबंधित इतर तंत्रज्ञान या विषयावर स्वतः भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे तसेच चला हवा येऊ द्या फेम प्रथितयश कलावंत योगेश शिरसाठ, एन. एस. डी.चे प्रख्यात प्रशिक्षक जयंत गाडेकर, सावली होईन सुखाची मालिकेची मुख्य अभिनेत्री प्रतीक्षा पोकळे, नेहा ठोंबरे, रीळ विशेषज्ञ, रविकिरण कांडाळकर तसेच अश्विनी गोरले अभिनेत्री राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली. आशिष नरखेडकर कास्टिंग डायरेक्टर प्रोडक्शन हेड इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.  

नवोदित कलावंतांसाठी ही कार्यशाळा एक सुवर्ण संधी आहे. कार्यशाळेत प्रवेश संख्या मोजकीच असून, प्रवेश शुल्क सुद्धा माफक आहे. विशेष म्हणजे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अगदी नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चीत करावा. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी कामगार व त्यांचे कुटुंबियांनी संपर्क क्रं. 9370150067 वर तसेच इतर इच्छुकांनी राजाभाऊ दखणे 9923026276 किंवा प्रा. डॉ. पी आर राजपूत 9373023644 यांचेशी संपर्क साधावा लागणार आहे.

Comments are closed.