बोपापूर व गणेशपूर (खडकी) येथील मंजूर RO प्लान्टचे खुले टेंडर काढा

जनसुविधा योजनेतून 24 लाख 48 हजाराचे प्लांट मंजूर

1

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील बोपापूर व गणेशपूर (खडकी) गावाकरिता जनसुविधा योजनेतून आरोप्लान्ट मंजूर करण्यात असले असून हे प्लांट बसविण्याकरिता राजकीय चढाओढ सुरू आहे. दोन्ही गावातील आरोप्लान्ट बसविण्याकरिता अधिजरी व सचिव यांच्यावर दबाव टाकून आपल्या मर्जीतील ठेकेदारांच्या नावाने काम घेऊन मलिदा लाटण्याचा प्रयत्न काही राजकीय पुढाऱ्यांनी सुरू केला आहे.

ग्रामवासीयांना 24 तास शुद्ध पाणी मिळावे याकरिता सौरऊर्जेवरील शुद्धीकरण आरोप्लान्ट असून हे टेंडर काही राजकीय पुढारी यांनी त्यांच्या जवळील ठेकेदाराला मिळण्याकरिता धावपळ सुरू आहे. दोन्ही गावातील आरोप्लान्टचे टेंडर म्यानेज करून दोन्ही आरोप्लान्ट बसविण्याचे काम करण्याकरिता मोठी धावपळ सुरू आहे. या कामाकरिता अधीकारी व सचिव यांच्यावर दबाव टाकत असल्याची चर्चा तालुक्यातील राजकीय गटात सुरू आहे.

पंचायत समिती मधील एक अधिकारी सुद्धा सदर कामासाठी राजकीय पुढा-याकडे फिल्डिंग लावत असून त्यांची मोठया प्रमाणात चांदी असल्याचेही बोलले जात आहे. बोपापूर व गणेशपूर येथील आरोप्लान्टचे टेंडर खुले करावे जेणे करून जास्तीत जास्त लोक टेंडर भरतील व ज्यांचे टेंडर पास होईल त्यालाच काम मिळेल अशी मागणी होत आहे.

तालुक्यात खनिज विकास निधी व ग्रामपंचायत अंतर्गत 25 ते 30 आरोप्लान्ट मंजूर करून बसविण्यात आले. परंतु यातील 90 टक्के आरोप्लान्ट बंद अवस्थेत असून जनतेला खराब व दूषित पाणी प्यावे लागत आहे. गोरगरीब जनतेला शुद्ध पाणी मिळावे व आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होऊ नये याकरिता शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून तालुक्यातील अनेक गावात आरोप्लान्ट बसविण्यात आले.

3 लाख 50 हजाराचे आरोप्लान्ट 7 लाख ते 9 लाख रुवयात बसविण्यात आले परंतु 90 टक्के आरोप्लान्ट बंद अवस्थेत असल्याने शासनाला कोट्यवधींचा चुना लागला आहे व जनता आजही दूषित पाणी पीत आहे. याला सर्वस्वी जवाबदार आरोप्लान्ट बसविणारे राजकीय ठेकेदार आहे. कारण काही पक्षाच्या लोकप्रतिनिधी च्या दबावामुळे आरोप्लान्टचे टेंडर म्यानेज करून राजकीय पुढाऱ्यांनी आरोप्लान्ट बसविण्याचे नित्कृष्ट कामे केले आहे.

उत्कृष्ट कंपनीचे साहित्य न बसविल्यामुळे अर्धेअधिक आरोप्लान्ट बंद अवस्थेत आहे. तर काही आरिप्लान्ट तर बसविल्या पासूनच बंद आहे त्या प्लांट मधून एक थेंब पाणीसुद्धा मिळाले नाही. राजकीय ठेकेदारीमुळे शासनाच्या पैशाचा फक्त चुराडा करून राजकीय ठेकेदारांनी कोट्यवधी रुपये कमविले आहे. अश्या राजकीय ठेकेदारांना कामे देऊन त्यांचेच पोट भरवण्याचे काम सध्या तालुक्यात पहायला मिळत आहे.

शासनाच्या कोट्यवधींच्या कामे करूनही जनतेला शुद्ध पाणी मिळत नसल्याने अश्या राजकीय ठेकेदारविरुद्ध प्रचंड सन्ताप व्यक्त होत आहे. नित्कृष्ट काम करणारे राजकीय ठेकेदारांना कोनतेही काम देण्यात येऊ नये व प्रत्येक कामाचे खुले ई टेंडरिंग करावे अशी मागणी तालुकातील जनता करीत आहे.

हे देखील वाचा:

खुशखबर: 152 संशयीतांपैकी सर्व निगेटिव्ह, दुसरी लाट ओसरतेय

Leave A Reply

Your email address will not be published.