लसीकरणा करिता ग्रामवासीयांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

सतपेल्लीत 83 तर पांढरकवडा (ल) येथे 50 लोकांनी घेतली लस

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सातपल्ली व पांढरकवडा (ल) येथे लसीकरणाच्या ग्रामवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन लस घेतली. 31 मे रोजी ग्रामपंचायत सतपल्ली व पांढरकवडा (ल) येथे आरोग्य विभाग व ग्रामवासी यांच्या सहकार्याने कोविड-19 लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले. आयोजीत केलेल्या कॅम्प मध्यें सतपेल्ली येथील 45 वर्षावरील 83 नागरीकांनि कोविशील्ड लस घेतली. तर पांढरकवडा येथील 50 लोकांनी लास घेतली.

आरोग्य विभागातर्फे गावांत लस उपल्ब्ध करुन दिल्याबद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले. लसीकरणा साठी समितीच्या वतीने लस घेण्याकरिता आव्हान करण्यांत आले होते त्या अनुषंगाने नागरिकाचा चांगला प्रतिसाद मिळाला गावातील कॅम्प यशस्वी करण्यासाठी कर्तव्य दक्ष सरपंच , ग्रामसेवक, पो.पाटील, आरोग्य कर्मचारि तथा गावकर्यांनी सहकार्य केले.

यावेळी सातपेल्ली येथील पोलीस पाटील नरसिंगराव चंदावार आणि सरपंच शंकर सिडाम यांनी अखेर पर्यंत लसीकरण स्थळी उपस्थित राहून सहकार्य केले. तर पांढरकवडा (ल) येथील सरपंच दुर्गा पिंपळकर,उपसरपंच माधुरी विचू,ग्रामपंचायत सदस्य प्रगती चेडे ,श्रीकांत कोयचाडे व सचिव ढवळे उवस्थित होते तर लसीकरण कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मधुकर राजूरकर,बालू चेडे,मंगेश विचू,अनिल कोठारी, प्रमोद ठाकरे, गणेश गेडेकर, मुकेश बोरकुटे,आशिष फुसे, अतुल विचू व समस्त ग्रामवासी यांनी मेहनत घेतली.

हे देखील वाचा:

खुशखबर: 152 संशयीतांपैकी सर्व निगेटिव्ह, दुसरी लाट ओसरतेय

Leave A Reply

Your email address will not be published.