जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोणी येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बोटोणीतील कै. बालाजी पंत चोपणे माध्यमिक विद्यालयात दिनांक 6 डिसेंबरला गुरुवारी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 4 थी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. समस्त ग्रामस्त व मनस्वी पिंपरे हिच्या वाढ दिवसा निमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेकरीता दोन गट आहे. पहिला अ गट हा ४ थी ते ७ वी पर्यंत व दुसरा ब गट हा ८ वी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ही स्पर्धा विनामुल्य असून प्रत्येक गटाच ४ बक्षिसे ठेवण्यात आली आहे. सोबतच प्रत्येक स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेकरिता सहभाग नोंदविण्याचा दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंतचा कालावधी असून परीसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
चित्रकला स्पर्धेसाठी ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ व ‘व्यसनाचे दुष्परिणाम’ हा आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. विजय साळवी तहसीलदार मारेगाव तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्नेहलता आंबेकर गट शिक्षण अधिकारी पं. स. मारेगाव तर प्रमुख अतिथी म्हणून दि एस वडगावकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मारेगाव हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन विठल पिंपरे व विशाल पिंपरे यांनी केले असून समस्त बोटोनी ग्रामवासियांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. चिंचोणी बोटोणी येथील सरपंच मंजुषा संजय मडावी व पं. स. सदस्या सुनिता लालसरे यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोटोणी ग्रामवासी परिश्रम घेत आहे.