दारुड्या मुलाची आईला फावड्याने मारहाण

दारुसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्या आईवर प्रहार

बहुगुणी डेस्क, वणी: दारुसाठी पैसे न दिल्याने दारुड्या मुलाने आपल्या आईला फावड्याने मारहाण केली. या मारहाणीत आई जखमी झाली. राजूर कॉलरी येथील लेबर कॅम्पमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

नंदा (40) या आपल्या पतीसह सोनापूर ता. वणी येथे राहतात. हे दोघेही मजुरी करतात. त्यांचा मुलगा प्रदुम (26) याला दारुचे व्यसन आहे. तो दारू पिल्यावर आईला नेहमी शिविगाळ व मारझोड करतो. रोजच्या मारझोड व शिविगाळीला कंटाळून नंदा या आपल्या पतीसह शुक्रवारी राजूर कॉलरी येथील एका भट्ट्यावर कामासाठी गेल्या. तिथल्या लेबर कॅम्पमध्ये ते दोघेही थांबले.

शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास प्रदुम हा दारु पिऊन लेबर कॅम्पवर आला. त्याने आईला दारूसाठी पैशाची मागणी केली. आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने फावडे मारण्याची धमकी दिली. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिला. प्रदुमने पावड्याने आईच्या डोक्यावर प्रहार केला. या मारहाणीत फावड्याचा दांडा नंदा यांच्या डोक्यावर लागला. त्यामुळे त्यांचे डोके फुटले.

त्यानंतर प्रदुम याने यापुढे जर दारूसाठी पैसे न दिल्यास आणखी मारहाण करणार अशी धमकी दिली. नंदा यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत आपल्या मुलाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 118(1) 351(2) 351(3) 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

फिट येऊन पडले खाली, चोरट्याने लंपास केली दुचाकी

दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात वाचला कुटुंबाचा जीव

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.