शिबला प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार

डॉक्टर आणि नर्स नसतात उपस्थित, जिल्हाधिका-यांकडे तक्रार दाखल

0

प्रदीप दुधकोहळे, झरीजामनी: झरी तालुक्यातील शिबला प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, तसेच परिचारिका कायमस्वरूपी उपस्थित राहत नाही. त्यामुळे परिसरातील गोरगरीब वैद्यकीय सेवेपासून वंचीत आहेत. याबाबत सरपंच बारीकराव टेकाम यांनी जिल्हाधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांचेकडे तक्रार केली आहे.

झरीजामनी या आदिवासी बहुल दुर्गम भागातील शिबला प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतात. मात्र इतर अधिकारी व कर्मचारी सकाळी 10 ते 4 च्या सुमारास उपस्थित असतात. परिसरात प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना पांढरकवडा येथील रुग्णालयात हलविण्यात येते. तर इतर आजार असलेले रुग्ण परिसरातील सुळसुळाट असलेल्या खासगी बोगस डॉक्टरकडे उपचार घेतात.

शिबला प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासस्थाने आहेत. ही निवासस्थाने सध्या अडगळीत पडली आहेत. येथे कार्यरत असलेले कर्मचारी सुद्धा नियमित उपस्थित नसतात. आलेल्या रुग्णांना धड सेवा मिळत नाही. यापूर्वी येथे 24 तास सेवा देणारे कर्मचारी अधिकारी होते. पण इथ जबाबदार अधिकाऱ्यांचा वचक नसल्यानं कर्मचारी उपस्थित राहात नाही. परिणामी परिसरातील ग्रामस्थ आरोग्य सेवेपासून वंचित आहेत.

((वणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला लागली घरघर))

या परिसरातील अधिकधिक रहिवाशी हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना खासगी दवाखान्याचा खर्च त्यांना परवडत नाही. मात्र शासनाचा गलेलठ्ठ पगार घेणारे डॉक्टर गरिबांना मिळणारी शासकीय सुविधा हिरावून घेत असल्याची तक्रार सरपंच बारीकराव टेकाम यांनी केली आहे. वरिष्ठांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष केंद्रित करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.