विवेक तोटेवार, वणी: यावर्षी वणी पोलीस स्टेशन अंतर्गत वणी व ग्रामीण भागात एकूण 279 दुर्गा मंडप सजले आहेत. याकरिता नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. मागील वर्षी पेक्षा यावर्षी मंडळांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षी वणी शहरात 118 सार्वजनिक दुर्गा माता मंडप तर वणी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागात 161 सार्वजनिक दुर्गा मातेची स्थापना करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 14 सार्वजनिक शारदा देवीची स्थापना करण्यात येणार आहे. वणी शहरात अनेक ठिकाणी नवरात्रात दुर्गा देवीची स्थापना करण्यात येते. या प्रसंगी उत्तम सजावट करण्यात येत असून मोठया उत्सवात नवरात्री उत्सव साजरा करण्यात येतो. या नवरात्री उत्सवानिमित्त वणी शहरात अनेक ठिकाणी गरबा उत्सव सुरू करण्यात आले आहे. राजकीय नेत्यांचा यात मोठा पुढाकार आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.