कंत्राटीकरणातून सरकारी पदे भरण्याविरोधात वणीत निदर्शने
विवेक तोटेवार, वणी: सरकारी विभागात असलेल्या रिक्त पदांपैकी ७०% पदे कंत्राटीकरणातून भरती करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात वणीत जोरदार निदर्शने करण्यात आली. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ( DYFI ) चे वतीने वणीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्या समोर दु १२ ते २ वाजेपर्यंत हे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
राज्य सरकार कडून आगामी निवडणुकीचे तोंडावर मेगा महा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. परंतु ही भरती कंत्राटी भरती आहे. कंत्राटी नोकरी प्राप्त करून हेच उमेदवार भविष्यात महाबेरोजगार होण्याची शक्यता अभ्यासाअंती समोर येते आहे. कारण विविध विभागातील आणि क्षेत्रीय कार्यालयातील रिक्त जागांपैकी ७०% पदे बाहेरील यंत्रणे मार्फत आणि कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
अश्या रिक्त जागांवर सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांच्याही नियुक्त्या करार पद्धतीने आणि ठराविक कालावधीसाठी करण्यात येणार आहेत. बाहेरील यंत्रणेमार्फत रिक्त पदे भरण्याबाबत वित्त विभागाने ११ डिसेंबर रोजी एक आदेश काढला आहे. यामागील मुख्य कारण अधिकारी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतानावरील एकूण खर्च कपात करणे हाच मूळ उद्देश असला तरीही कंत्राटी पद्धतीने भरल्या गेलेल्या अधिकारी व कर्मचार्यांशी सरकारचा काहीही संबंध नसेल.
कंत्राटी कर्मचारी पुरवठा करणाऱ्या कंपनीला सरकार कडून वेतनापोटी एक रक्कम दिली जाईल. त्यामुळे त्याच्या वेतनाचे काही प्रश्न उदभवल्यास त्याला सरकार जवाबदार राहणार नाही. विशेष म्हणजे ही कंत्राटी नोकरी असल्याने भविष्यात कायमची नोकरी मिळण्याची हमी नसेल. त्यामुळे २५-३० वयोगटातील ४-५ वर्षे नोकरी केल्या नंतर ३५-४० मध्ये महाबेरोजगारी कडे वळण्याची शक्यता जास्त आहे.
नोकऱ्या खाजगी असल्याने अरक्षणालाही किंमत उरणार नाही. करीता डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया( DYFI ) ने दि. १८ डिसेंम्बर ला राज्यव्यापी आंदोलनंतर्गत वणी येथेहि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्या समोर निदर्शने आंदोलन करून उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करणारे शासन निर्णय रद्द करून सर्व बेरोजगारांना स्थायी नोकरी देणारी महाभरती करावी अशी मागणी केली आहे.
या आंदोलनात डी वाय एफ आय चे राजाराम प्रजापती, प्रशांत कुलमेथे, उत्तम सोयाम, अमर्त्य मोहरमपुरी, वैभव मजगवळी, बादल कोडापे, प्रदीप ताकसांडे, महेश सोनटक्के, अक्षय गावंडे, पवन कोडापे, प्रवीण उईके, ओम गाऊत्रे, दत्त नागोसे, शशिकांत शेंडे, प्रशिल नगराळे, प्रवीण मडावी,सुदर्शन टेकाम, जयंत कोयरे, गजानन ताकसंडे, संजय कोडापे, कुमार मोहरमपुरी प्रामुख्याने होते.
लिंकवर क्लिक करून पाहा बातमीचा व्हिडीओ…