गणेश मंडळासाठी नगर पालिकेतर्फे स्पर्धा
समाजजागृती करणा-या आणि पर्यावरणपूरक मंडळांसाठी बक्षीस
बहुगुणी डेस्क, वणी: गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादी समाजोपयोगी गोष्टींवर प्रबोधन आणि जागरुकता निर्माण व्हावी यासाठी गणेश मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नगरपालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत ही स्पर्धा घेण्यात येत आहे. यासाठी भरगोस बक्षिसांची लूट देखील आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाचा मूळ उद्देश आज बाजूला जाऊन त्याऐवजी हा उद्देश चंगळवादाकडे वळू लागला आहे. मात्र आजही काही मंडळ पर्यावरण पूरक आणि प्रबोधनाचं काम गणेशोत्सवाच्या माध्यमातून करताना दिसत आहे. अशा मंडळासाठी ही नगरपालिकेने स्पर्धा आयोजित केली आहे. यात प्रबोधन आणि पर्यावरण पूरक बाबींकडे लक्ष दिलं गेलं असून जे मंडळ हा उद्देश घेऊन कार्य करीत आहे अशा मंडळांना बक्षीस दिलं जाणार आहे. साठी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष स्वतः टीमसोबत मंडळाला भेट देऊन याबाबत परीक्षण करणार आहे.
स्पर्धेचे निकष अशा प्रकारे आहेत
- गणेशोत्सवादरम्यान निर्मल्याची विल्हेवाट कशी लावली आहे का?
- प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली आहे का?
- सजावट पर्यावरण पूरक आहे का?
- सजावटीमध्ये सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला का?
- लोकपरंपरा आणि लोकसंस्कृती जपली गेली आहे का?
- दहा दिवसात सामाजिक उपक्रमाला महत्त्व दिले गेले का?
इत्यादी निकष पाळणा-या मंडळाला 15 हजार, 10 हजार आणि 7 हजार असे बक्षीस दिले जाणार आहे. तरी मंडळाने हे निकष पाळून स्वच्छ शहर, पर्यावरणपूरक शहर याला हातभार लावावा असे आवाहन नगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे.