झरीत ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे निवेदन

पवारांविरोधात सूडबुद्धीतून कारवाईचा आरोप

0

सुशील ओझा, झरी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे एसएससीबी (महाराष्ट्र स्टेस कॉर्पोरेशन बँक) प्रकरणात जाणीवपूर्वक नाव टाकण्यात आले असून ईडीने त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवली आहे. हे केवळ सूडबुद्धीतून करण्यात आले आहे, असा आरोप करत गुरूवारी 27 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस झरी तालुक्यातर्फे झरी येथे तहसिलदारांना निवेदन देऊन याचा निषेध केला आहे.

Podar School 2025

शरद पवार यांचा या बँकेच्या संचालक मंडळाशी कुठलाही संबंध नसताना सरकारने ईडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही कार्यवाही केली आहे. शरद पवारांनी सरकारविरोधात प्रभावीपणे आघाडी उघडली आहे. लोकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या कारणाने सरकार ईडीच्या आडून असा सूडबुद्धीचा डाव खेळत आहे. असा आरोप करत या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर मानकर, विशाल पारशिवे, अशोक क्षीरसार, सुनील पारशिवे, संजय चेलपेलवार, संतोष बल्लावार, सत्यनारायण कुंटावार, वाल्मिक आत्राम, संतोष मुद्देलवार, रमेश नखाते, राजू मार्कावार, बालू केमेकार, विलास तोलकवार यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.