बोअरिंग आणि महागडे शिक्षण आता सुखकर
"एज्युकेअर" सायन्स क्लासेसने वाढेल रुची, तेही इतर ट्युशन्सपेक्षा अर्ध्या खर्चात
बहुगुणी ऍडव्हटोरिअल डेस्क: बारावीचं वर्ष सगळ्यात महत्त्वाचं. विद्यार्थी आणि पालकांना अत्यंत काळजीत टाकणारं हे वर्ष असतं. त्यातही 11 वी आणि 12वीच्या कोचिंग क्लासेसचा खर्च हा जवळपास 30 हजार रूपये लागतो. बरं एवढा पैसा खर्च करूनही विद्यार्थी त्यात रस घेऊन करतीलच असे नाही. मात्र इतर कोचिंग आणि ट्युशन क्लासेसच्या तुलनेत जर जवळपास अर्ध्या खर्चातच विद्यार्थ्यांसाठी वणीत व्यवस्था झाली आहे. सेट परीक्षा क्वॉलिफाय केलेले तसेच अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले प्रा. कुणाल वनकर यांचे ‘एज्युकेअर’ क्लासेस वणीत सुरू झालेले आहेत. त्यामुळे कमी खर्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण याचा लाभ वणीतील 11 वी आणि 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना घेता येईल.
उच्चविद्याविभूषीत शिक्षक हे ‘Educare’ चे प्रमुख वैशिष्ट्य आहे. एम. एस्सी. केमेस्ट्री व सेट क्वॉलिफाय केलेले प्रा. के. जी. वनकर, एम. एस्सी. मॅथ्स व सेट क्वॉलिफाय केलेले प्रा. मदान, एम. एस्सी. फिजिक्स व बी. एड. क्वॉलिफाय केलेल्या प्रा. एस. डी. धांडे, एम. एस्सी. बॉयोलॉजी क्वॉलिफाय केलेल्या प्रा. के. पी. जाचक यांसारखे सब्जेक्ट एक्स्पर्ट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताात. या तज्ज्ञ मागदर्शकांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होतो.
केवळ शिक्षकच नाही तर एक लेखकही
प्रा. कुणाल वनकर हे केवळ शिक्षकच नाही तर ते एक नामवंत लेखक सुद्धा आहेत. त्यांचं “आय लव्ह स्टडिंग” हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या प्रचंड पसंतीचे ठरत आहे. अॅमेझॉन व फ्लिपकार्ट वरही हे पुस्तक उपलब्ध आहे. देशभरातून या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे. सायन्स म्हटलं की अत्यंत टेक्निकल विषय असतात. पण यातही इंटरेस्ट डेव्हलप करून त्या विषयात गोडी निर्माण करून मनापासून कसं शिकायचं याचं मार्गदर्शन त्यांनी या पुस्तकातून केलं आहे.