झरी तालुक्यातील आठ जिल्हा परिषद शाळेला लागणार कुलूप ?
१० पेक्षा कमी विदयार्थी असलेल्या शाळा होणार बंद
सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र सरकारने १० पेक्षा कमी संख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ७९ जिल्हा परिषद शाळा बंद होणार असून शाळेतील वर्ग १ ते ५ वर्गातील शाळेत १० विद्याथी पेक्षा कमी विद्यार्थी शिकत असेल अशा शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार दिसत आहे.
लॉकडाऊन पूर्वी सरकारने शिक्षण विभाकडून सरकारने संपूर्ण माहिती घेतली असून लॉकडाऊन संपण्यापूर्वी तालुक्यातील गाडेघाट (वे), रायपूर, बिहाडीपोड (माथार्जुन), बेलमपल्ली (मांडवी), खडकी, दिग्रस (जुना), गाडेघाट (धानोरा) व दरारा या ८ जिल्हा परिषद शाळा असून या शाळेला कुलूप लागण्याची दाट शक्यता आहे. वरील शाळा बंद झाल्यास त्या शाळेतील शिक्षकांना दुसऱ्या शाळेत समायोजनही करण्यात येणार येणार आहे.
मराठी माध्यमाच्या शाळेला इंग्रजी माध्यमांच्या शाळेमुळे उतरती कळा आली असून सर्वांची धाव इंग्रजी मध्यमांच्या शाळेकडे वळली आहे. स्पर्धेच्या युगात इंग्रजी माध्यमांच्या शाळेमुळे जिल्हा परिषद शाळा बंद पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे..