वणीत 15 ऑगस्टला ‘वंदे भारत- एक शाम देश के नाम’ हा भव्य दिव्य कार्यक्रम

जय श्री कृष्ण जन्माष्टमी समितीद्वारा कार्यक्रमाचे आयोजन.... कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्तींचा होणार सन्मान

जितेंद्र कोठारी, वणी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट रोजी वणीत ‘वंदे भारत- एक शाम देश के नाम’ या भव्य दिव्य देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वणी- मुकुटबन रोड वरील श्री विनायक मंगल कार्यालयच्या हॉलमध्ये संध्याकाळी 6 वा. ते 10 वाजेपर्यंत होणार आहे. गीत, संगीत आणि नृत्याचा अनोखा संगम असणा-या या कार्यक्रमाद्वारे देशभक्तीचा जागर केला जाणार आहे. कार्यक्रमाद्वारे स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारी, शहिदांना संगीतमय मानवंदना दिली जाणार आहे. जय श्री कृष्ण जन्माष्टमी समितीद्वारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला वणीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन जय श्री कृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल विजयकुमार चोरडिया यांनी केले आहे.

‘वंदे भारत – एक शाम देश के नाम’ या भव्य दिव्य कार्यक्रमात राज्यातील 70 कलावंताची टीम आपली कला सादर करणार आहे. यात झी युवा वरील सुप्रसिद्ध कार्यक्रम संगीत सम्राट फेम भूषण जाधव, गौरी शिंदे, सुरभी ढोमणे, मुकुल पांडे, प्रणय कुथे, अमित गणवीर, अविनाश सोनूले, सचिन ढोमणे, डॉ. मनोज सालपेकर हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. याशिवाय संपूर्ण देशात आपल्या नृत्याची छाप सोडणा-या नृत्य कलावंतांची टीम देखील कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे.

विविध क्षेत्रातील व्यक्तींचा होणार सन्मान
याच कार्यक्रमात वणी व परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, प्रशासकीय, कायदा व सुव्यवस्था, कला, खेळ, संस्कृती, पर्यावरण, आर्थिक, महिला सबलीकरण इत्यादी क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणा-या व्यक्तींचा तसेच गृपचा सन्मान केला जाणार आहे. निस्पृह भावनेने लोकांची सेवा करणा-या व विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणा-या व्यक्तींचा सन्मान हे देखील या कार्यक्रमाचे एक आकर्षण राहणार आहे.

वणीत पहिल्यांदाच असा भव्य दिव्य कार्यक्रम – ऍड कुणाल चोरडिया
या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या भव्य दिव्य प्रकारे साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे. जन्माष्टमी आणि अमृत महोत्सव असा दुग्ध शर्करा योग यावेळी जुळून आला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यविरांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी व राष्ट्रप्रेमाला अधिक बळकटी देण्यासाठी वंदे भारत – एक शाम देश के नाम या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो.
– ऍड कुणाल विजयकुमार चोरडिया, अध्यक्ष जय श्री कृष्ण जन्माष्टमी समिती

15 ऑगस्ट रोजी होणा-या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन जय श्री कृष्ण जन्माष्टमी समितीद्वारा करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर गोयनका-उपाध्यक्ष, हितेश गोडे -उपाध्यक्ष, सागर जाधव – सचिव, अमोल धानोरकर – सहसचिव, सचिन क्षीरसागर – कोषाध्यक्ष, राजू रिंगोले – सह कोषाध्यक्ष, पियूष चव्हाण – प्रसिद्धी प्रमुख, मयूर गेडाम – सह, प्रसिद्धी प्रमुख, रितेश फेरवाणी – कार्याध्यक्ष, शुभम मदान – सह कार्याध्यक्ष यांच्यासह

आशुतोष पोद्दार, सागर मदान, राजू अडपल्लीवार, कपिल कुंटलवार, मंगेश घोटकर, राज चौधरी, निखिल गोहने, बिट्टू खडसे, निखिल मारखंडे, संकेत रेभे, विनोद खडसे, रोशन जाधव, संदीप जुनघरे, गोविंदा नरपांडे, प्रकाश व-हाटे, विलास आवारी, योगेश आवारी इत्यादी परिश्रम घेत आहे.

Comments are closed.