सिमेंटरोडवरील विजेचे खांब हटविण्याची मागणी

जिल्हा बँक अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी दिले निवेदन, कामात दिरंगाईचे विरोध म्हणून प्रतिकात्मक लोखंडी खांब दिले भेट

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव रेलवे फाटक ते साईमंदिर पर्यंत सुरु असलेल्या सिमेंट रस्त्याच्या मधोमध वाहतुकीस अडथळा असलेले वीज खांब तात्काळ हटविण्यात यावे. अशी मागणी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी केली आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता याना निवेदन देताना कोंगरे यांनी कामात होत असलेली दिरंगाईच्या विरोध स्वरूप त्यांनी प्रतिकात्मक लोखंडी खांब भेट दिले.

तब्बल 4 कोटीच्या निधीतून चिखलगाव रेल्वे गेट ते साई मंदिर पर्यंत रस्ता रुंदीकरणसह सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकाम सुरू आहे. या मार्गावर संजय ट्रॅक्टर्सच्या दुकानापासून ते मणीप्रभा टॉवर बिल्डिंगपर्यंत 10 वीज खांब व 2 डीपी रस्त्याच्या मधोमध आले आहे. विद्युत लाईन शिफ्टिंग करण्यावरून बांधकाम विभाग व महावितरण कंपनीत वाद सुरू होते. त्यामुळे अटारा ऑटोमोबाईल ते साई मंदिर चौकापर्यंत रस्त्याचे बांधकाम रखडले. अखेर महावितरण कंपनीने दिलेल्या इस्टिमेटनुसार वीज खांब काढून वाहिनी शिफटिंग करण्याचे कार्य सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत शाखेकडे देण्यात आले. 

काही दिवसांपूर्वी सार्व. बांधकाम विभागाने नागपूर येथील ए.एन.के. पावरटेक कंपनीला या मार्गावरील विद्युत लाईन शिफ्टिंगचा टेंडर मंजूर केला. तसेच कंपनी तर्फे वणी येथील बिलोरिया इंटरप्राइसेस या कंत्राटदाराला वर्कऑर्डर दिले. परंतु अद्यापही शिफ्टिंगचे कार्य सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

25  जाने. पासून काम सुरु करणार
चिखलगाव रेल्वेगेट ते साई मंदिर चौकापर्यंत रस्त्याच्या मधात येत असलेले विद्युत खांब शिफ्टिंगचे वर्क ऑर्डर मिळाले आहे. खाजगी कारणास्तव काम सुरु करण्यास थोडं उशीर झाले. 25 जानेवारी पासून शिफ्टिंगचे कार्य सुरु करणार.
विवेक बिलोरिया: संचालक, बिलोरिया इंटरप्राइसेस

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.