आली वीज, गेली वीज, सांगा कशी येईल नीज

विजेच्या लपंडावाने, वीजग्राहक झालेत त्रस्त

0

संजय लेडांगे, मुकुटबन:  आली वीज, गेली वीज, सांगा कशी येईल नीज. हेच म्हणायची वेळ सध्या परिसरातील जनतेवर आली आहे. वृद्ध, लहान मुलं यांना या विजेच्या लपंडावाचा विशेष फटका बसत आहे. वीज महावितरण कंपनीकडून विजेचा लपंडाव वाढल्याने परिसरातील वीजग्राहक चांगलेच त्रस्त झालेत. ग्राहकही दररोज गेली-आलीचा पाढा वाचत, विजेच्या लपंडावची सवय  नाईलाजाने लावून घेत आहेत.

मांगली, भेंडाळा, हिरापूर, पिंपरड राजूर(गो) आणि बहिलमपूर आदी गावांतील विजेचा लपंडावाचा क्रम दिवसेंदिवस वाढत आहे. वीज ग्राहकांच्या डोकेदुखीत भर पडत आहेत. दिवस-रात्र वीज कधी गूल होईल याची शाश्वती उरली नाही. पाच-दहा मिनिटांसह तासंतास वीज गूल राहते. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे गावागावांत रोष व्यक्त होत आहेत.

सध्या परिसरात चोरट्यांची भीती आहे. वीज गूल झाली असता, अख्खा गाव चोरांच्या भीतीने जागा होतो. अशी परिस्थिती परिसरात निर्माण झाली आहे. विजेचा लपंडाव आता नियमित झाला आहे. गेली-आलीचा पाढा वीज ग्राहक दररोज वाचत आहेत. विजेचा लपंडावाने परिसरतील गावें अंधारात जात आहेत. वीज महावितरण ग्राहकांना तत्पर सेवा देण्यास फेल ठरत आहे.आजच्या परिस्थितीत परिसरात विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी परिसरात वीज महाविरणप्रती रोष व्यक्त केला जात आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.