विद्युत तार व केबल चोरी करणाऱ्या टोळीतील एकास अटक

जितेंद्र कोठारी, वणी : महावितरण कंपनीचे विद्युत वाहिनीचे अल्युमिनियमचे तार व केबल चोरी करणाऱ्या टोळीतील एका चोरट्याला चोरीच्या मालासह अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हा शाखा (LCB) पथकाने बुधवार 20 सप्टें. रोजी वणी मुकुटबन मार्गावर घोन्सा टी पॉइंटवर ही कारवाई केली. सैय्यद अब्दुल अली (44) रा. फुकटवाडी, वणी असा आरोपीचा नाव आहे. पोलीस पथकाने आरोपी कडून एक टाटा सुमो वाहन व त्यामध्ये तारचे बंडल, गॅस कटर, सिलेंडर व इतर साहित्य जप्त केला.

अटकेतील आरोपीस इतर गुन्हेबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्याचे साथीदार अनिल येमुलवार व दिनेश मेश्राम सोबत वणी, राळेगाव, शिरपूर, वडगाव (जंगल), व मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत 6 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पोलिसांनी आरोपीच्या घरा समोर उभी असलेली बोलेरो पीकअप मालवाहू वाहनातून अल्युमिनियम ताराचे 8 बंडल, तुकडे केलेले तारेचे बंडल, लोखंडी इलेक्ट्रिक पोलचे 13 तुकडे, केबल जाळून काढलेले तांब्याचे तार 3 पोते असे एकूण 1 लाख 63 हजाराचा मुद्देमाल मिळून आला. 

पोलिसांनी आरोपी कडून टाटा सुमो, बोलेरो पिकअप वाहन तसेच चोरी गेलेले तार अस एकूण 7 लाख 72 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यातील आरोपी आणि मुद्देमाल शिरपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास शिरपूर पोलीस करणार आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पोलीस निरीक्षक (LCB ) आधासिंग सोनोने यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, अमोल मुडे, पोलीस अंमलदार योगेश गवार, सुनिल खंडागळे, भोजराज करपते, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सुधीर पांडे सतीष फुके, नरेश राउत यांनी पार पाडली.

Comments are closed.