मनसे रोजगार महोत्सव 2023 साठी नाव नोंदणी आजपासून सुरु

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वणी विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार तरुण तरुणींसाठी रोजगार महोत्सव 2023 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 3 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या रोजगार महोत्सव मेळाव्यासाठी नाव नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया आज गुरुवार 21 सप्टे. पासून सुरु होत आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांचे हस्ते भांदेवाडा येथील विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज चरणी नारळ फोडून रोजगार मेळाव्याचे शुभारंभ आज करण्यात आले.

योग्य मार्गदर्शन आणि संधी न मिळाल्याने शैक्षणिक गुणवत्ता आणि पात्रता असून अनेकांना करिअर घडवता येत नाही. बेरोजगारीमुळे युवकांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे. मनसे पक्ष नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारा भव्य रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होऊन सुशिक्षित व कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर करण्याची संधी प्राप्त झालेली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

देशातील 50 पेक्षा अधिक आयटी, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, ॲग्रिकलचर, फायनॅन्स, बीफार्मा, नर्सिंग,डिलिव्हरी बॉय, सिक्युरिटी गार्ड, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी व सेवा क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहे 5 हजार पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार असल्याची माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांकरिता संधी उपलब्ध झालेली असून युवकांना ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. तसेच यासाठी तयार करण्यात आलेले QR code स्कॅन करून मेलाव्याबाबत अधिक माहिती मिळवू शकता. ऑफलाईन फार्म मनसेचे वणी येथील जनसंपर्क कार्यकाळ ‘शिवमुद्रा’ नांदेपेरा रोड वणी येथे स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती मनसे च्या वतीने देण्यात आली आहे.

लिंकवर क्लिक करून मनसे रोजगार महोत्सव व्हॉट्सप ग्रुपमध्ये शामिल व्हा ….

https://chat.whatsapp.com/LCMiZPMjAdR96l7wxbRDYf

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अधिकृत Google फार्म

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf5Jwy3L9mGW82RzFSy5QTdXt2edbK-P3p0RdEykDr6wSFVtw/alreadyresponded

 

 

 

 

Comments are closed.