ईलेक्ट्रीक शॉक लागून कर्मचा-याचा दुर्दैवी मृत्यू

होतकरू तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील करणवाडी रोडवर असलेल्या एका बारमध्ये काम करणा-या कर्मचा-याचा इलेक्ट्रीकचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी दिनांक 22 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गणेश गणपत मेश्राम (28) रा. पेंढरी ता. मारेगाव असे मृताचे नाव आहे. तो करणवाडी रोडवरील एका बारचा कर्मचारी होता. गुरुवारी दुपारी बारला लावलेल्या संरक्षक जाळीला त्याचा स्पर्श झाला व तो तिथेच कोसळला. सहका-यांना जेव्हा गणेशला शॉक लागल्याचे कळले तेव्हा त्याला खूर्चीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. गणेशच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक तीन महिन्याची मुलगी आहे. एका होतकरू मुलाचा असा दर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.