ऑफिस संपण्याआधीच कर्मचारी धरतात घरचा रस्ता

बायो मॅट्रिक मशीनच्या अभावी कर्मचा-यांचा मनमानी कारभार

0

सुशील ओझा, झरी: तालुक्याच्या मुख्यालयात राहण्यासाठी तसेच कार्यालयात वेळेवर हजर राहण्यासाठी वेळोवेळी अनेक निवेदन आजपर्यंत पंचायत समिती मध्ये देण्यात आले. परंतु अजून पर्यंत कुणीही याची दखल घेत नसल्याचे दिसून येते आहे. परिणामी कार्यालय रिमाके दिसून येत आहे.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहावे या साठी बायो मॅट्रिक मशीन लावण्या संबंधित शासनाने आदेश दिले आहे. परंतु अजून पर्यत पंचायत समिती कार्यालयातील काही विभागात बायो मंत्रीक मशीन लावण्यात आलेली नाही. त्याच प्रमाणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीन राहण्याबाबत आदेश आहे मात्र अजून पर्यंत अनेक कर्मचारी तालुका ठिकाणी राहत नाही.

अनेक कर्मचारी हे पांढरकवडा, वणी यवतमाळ व इतर ठिकाणाहून रोज ये-जा करीत असल्याने उशिरा कार्यालयात उपस्थिती राहणे व कार्यालयीन वेळेआधीच घरी निघून जाणे असे प्रकार चालू आहे .या सर्व प्रकारामुळे अनेक सामान्य नागरिकाचे काम हे प्रलंबित राहत आहे व त्यांना त्यांच्या हक्काच्या योजना मिळण्यापासून वंचित रहावं लागत आहे . अनेक सामान्य नागरिक हे आपले शेतीचे तसेच इतर कामे बाजूला सारून तालुक्याला येतात परंतु कर्मचारी हे वेळेवर त्यांना भेटत नाही त्या मुळे नाइलाजास्तव त्यांना परत जावे लागत आहे .

अधिकारी आणि कर्मचारी यांना आम्ही वेळोवेळी कार्यालयीन वेळेत हजर रहा म्हणून सांगत असतो. परंतु कर्मचारी आमच्या आदेशाचे पालन करीत नाही असे पंचायत समितीचे सभापती यांनी सांगितले.

आज माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत उदकवार तसेच सोबत कार्यकर्ते हे काही वैयक्तिक काम घेऊन पंचायत समिती मध्ये गेले होते. मात्र सायंकाळी 4:40 ते 5:20 वाजले असता कार्यालयातील कर्मचारी घरी जाण्याकरता बाहेर निघणे सुरू झाले होते. कार्यालयाची वेळ संपण्यापूर्वीच कर्मचारी हे कोणत्याही अधिकारी यांची परवानगी न घेता बाहेर आपल्या गावाकडे निघून सुद्धा गेले होते.

या बाबत गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांना विचारपूस केली असता त्यांनी मी बाल विकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत झरी तालुका दौऱ्यावर आहे असे सांगितले. कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या खुर्चीवर एक लहान मुलगा मोबाईलवर गेम खेळत असल्याचे सुद्धा निदर्शनास आले. लोकप्रतिनिधी असलेले राजेश्वर गोंड्रावार हे एकमेव 5:30 वाजता सुद्धा उपस्थित असल्याचे दिसून आले. या सर्व घटनेमुळे सामान्य जनतेमध्ये कर्मचाऱ्याच्या कामचुकारपणा समोर आला आहे.

याकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे . वेळेपूर्वी काम सोडून कार्यालयातून काम सोडून निघून जाणे अश्या कामचुकार कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. कारवाई न केल्यास माहिती अधिकार जनजागृती समिती, यवतमाळ कडून करण्यात येणार असे जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.