आरोपीला मोबाईल देणे पडले पोलिसाला महागात, हवालदार निलंबित

जितेंद्र कोठारी, वणी: पोलीस कोठडीत असलेल्या गँगरेपच्या आरोपीचे बाहेरील व्यक्तीसोबत मोबाईलवर बोलणे करून देणे पोलीस हवालदाराला चांगले महागात पडले. या प्रकरणी ठाणेदारांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे रिपोर्ट सादर केला होता. त्यावर कार्यवाही करत पोलीस अधिक्षकांनी हवालदार विलास किनाके यांना निलंबित केले आहे.

गेल्या आठवड्यात परिसरात गँगरेपची घटना उघडकीस आली होती. याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. वणी पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना तात्काळ अटक केली होती. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने यातील मुख्य आरोपीला 3 दिवसांची तर 3 सहआरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

रात्रीच्या सुमारास आरोपी पोलीस कोठडीत असताना वणी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास किनाके यांनी एका आरोपीचे बाहेरील व्यक्तीसोबत मोबाईलने बोलणे करून दिले होते. मात्र याची माहिती ठाणेदार अजीत जाधव यांना मिळाली. त्यांनी सीसीटीव्हीवरून याची तपासणी केली असता यात तथ्य आढळून आले. ठाणेदारांनी याचा रिपोर्ट उपविभागीय अधिकारी व यांच्या माध्यमातून पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोडे यांच्याकडे पाठवला.

या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत एसपी यांनी कार्यवाही करत हवालदार विलास किनाके याला निलंबित केले. मध्यंतरी ठाणेदारांचा पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांवरचा वचक संपला होता. त्यामुळे अनेक कर्मचारी बेलगाम झाले होते. याची नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी तत्कालीन एसपींकडे तक्रार देखील केली होती. मात्र नवीन ठाणेदारांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी पुढाकार घेतला. त्यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा: 

लोकांना दिसतये मात्र अधिकारी आणि लोक प्रतिनिधींच्या डोळ्यावर पट्टी !

फक्त 499 रुपयांमध्ये कोणतेही 2 ब्रँडेड कपडे, इंटरनॅशनल बँडवर 50 टक्के सूट

Comments are closed.