वणीमध्ये शनिवारी भव्य रोजगार मेळावा
बेरोजगार युवक - युवतींना सुवर्णसंधी, लगेच मिळणार ऑफर लेटर
बहुगुणी डेस्क: एकता निराधार संघाच्या वतीने वणीमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुमारे 4 हजार नोक-या देण्याचे टारगेट ठेवण्यात आले आहे. वणीतील साई मंदिर जवळील वसंत जिनिंग हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. बेरोजगार उमेदवारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. हा मेळावा 10 वी, 12 वी, पदविकाधारक, पदवीधर, आयटीआय इत्यादी उमेदवार या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. मेळाव्यादरम्यान उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स कॉपी आणव्या लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एकता निराधार संघाचे संस्थापक सागर रेड्डी यांच्याद्वारे लगेच ऑफर लेटर दिले जाणार आहे.
या मेळाव्यात झॅप टेक, अमेझॉन (डिलिव्हरी), आयडीबीआय, बँक ऑफ बडोदा, एचसीआयएफ, फ्लिपकार्ट, ऍक्सिस सेक्युरिटी, एचडीएफसी, विएन्ना मल्टिवेन्चर, नवभारत फर्टिलायझर, एसबीआय सेल्स, फ्लिपकार्ड लार्ज, मल्टिप्लेक्स, जेबीएम, एमेझॉन (सॉर्टर्स) इत्यादी नामवंत कंपनी सहभागी होणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी धीरज भोयर – 9766424131, डॉ. प्रशिक बरडे – 9096826742, मंगेश अवचट – 7218897898, अमोल कुचनकर – 7507520051 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एकता निराधार संघाचे जिल्हाध्यक्ष विजूभाऊ नगराळे यांनी केले आहे.