फक्त एका वॉट्सऍप मॅसेजने पदवीधर मतदार यादीत नाव नोंदवा…

9881233335 या व्हॉट्सअप क्रमांकावर डॉक्युमेंट पाठवून त्वरित नाव नोंदवा - डॉ. महेंद्र लोढा

बहुगुणी डेस्क, वणी: लवकरच अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. यात केवळ पदवीधर असणा-यांनाच मतदान करता येणार आहे. केवळ आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, डीग्री सर्टीफिकेट किंवा अंतिम वर्षाची गुणपत्रिका, पासपोर्ट साईज फोटो, कागदपत्रात नाव बदल झाल्यास त्याचे प्रमाणपत्र, अशा मोजक्या डॉक्युमेंटने मतदारयादीत नाव समाविष्ट करता येणार आहे. विशेष म्हणजे आधीची मतदारयादी रद्द झाल्याने ज्यांचे आधीच्या (5 वर्ष) यादीत नाव असेल त्यांना देखील नवीन नोंदणी करून नाव समाविष्ट करावे लागणार आहे. त्यामुळे 9881233335 या व्हॉट्सअप क्रमांकावर डॉक्युमेंट पाठवून आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.

सध्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अभियान सुरू आहे. यात अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यातील पदवीधर व्यक्तींना मतदान करता येणार आहे. शासनाने जुनी यादी रद्द केली असल्याने सर्वच पदवीधरांना नव्याने नोंदणी करणे गरजेचे आहे.

अवघे काही दिवस शिल्लक – डॉ महेंद्र लोढा
दिवाळीच्या सुटीत अनेक लोक वणीत येतात. त्यामुळे अशा पदवीधर असलेल्या मतदारांना फक्त डॉक्युमेंट व्हॉट्सअप करायचे आहे. त्यामुळे घरबसल्या मतदारांना मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे. पदवीधरांना 9881233335 या व्हॉट्सअप क्रमांकावर डॉक्युमेंट पाठवायचे आहे. हा क्रमांक माझा वैयक्तिक मोबाईल नंबर असल्याने सदर डॉक्युमेंट हे सुरक्षीत राहणार आहे. त्यामुळे पदवीधर मतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे – डॉ महेंद्र लोढा

वरील कागदपत्रे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाठवावीत- 9881233335

किंवा  – 

गूगल फॉर्म लिंक-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSff7yiattDRTKDjWlpy2jWDfvLXiYMRawSeIB1w0GKIsJRgVw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0

Comments are closed.