जब्बार चीनी, वणी: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तालुक्यात ठिकठिकाणी झाडे लावण्यात आली. वणीतील एसपीए महाविद्यालयात मित्रपरिवार टीम यांच्या वतीने मुख्यधापक प्रमोद क्षिरसागर यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. तर बाजीराव महाराज वृध्दाश्रम येथे वृध्दांसोबत वृक्षारोपण करून हा दिन साजरा कऱण्यात आला. याशिवाय कोविड केअर सेंटर परसोडा येथे ही वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एसपीएम शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. सध्या पर्यावरण धोक्यात आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. वृक्ष केवळ सावली किंवा ऑक्सिजनच देत नाही तर तो निसर्गाचीही शोभा वाढवतो. त्यामुळे शिक्षण प्रसारक मंडळातर्फे एसपीएम शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक रमेश तामगाडगे, मालगडे, मडावी, लांडे यांची उपस्थित होती. होते, याशिवाय माजी विद्यार्थी राणी मेश्राम, आकाश जीवतोडे, पल्लवी मेश्राम, प्रतीक क्षीरसागर, सुरभी माहकुलकर यांची देखील उपस्थिती होती. सदर कार्यक्रम हा मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करून घेण्यात आला.
नगर सुधार समितीद्वारा वृक्षारोपण
वणी यवतमाळ रस्त्यावरील रामदेव बाबा अपंग मूकबधीर शाळेच्या बाजूला गेल्या 17 वर्षांपासून बाजीराव महाराज हे वृद्धाश्रम सेवा देत आहे. या वृद्धाश्रमात नगर सेवा स्वच्छता समिती तर्फे नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यात येते. पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून वृध्दांसोबत या ठिकाणी वड, पिंपळ यासारखे वृक्ष लावण्यात आले. याशिवाय तालुक्यातील कोविड सेंटर परसोडा येथेही वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी सुनील नांदेकर, संजय पेचे, मुख्याध्यापिका दांडेकर, नामदेव शेलवडे, ढवस, प्रमोद मिलमिले, महेश लिपटे, राजेंद्र साखरकर, प्रमोद झामरे, गुणवंत लांजेवार, तुळशीराम बेलेकर, यशवंत बोरडे, श्रीराम कारडे, दौलत गरुड, ज्योती साखरकर, स्मिता नांदेकर, चंदा एकरे, नंदा शेलवडे यांची उपस्थित होती. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मारोतराव चोपणे यांनी केले.
हे देखील वाचा: