मोबाईल टॉव्हर चोरट्याच्या रडारवर, चोरले किमती उपकरणं

30 हजारांच्या उपकरणावर चोरट्यांचा डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: रसोया प्रोटीन्स व सावर्ला येथील लावलेल्या मोबाईल टॉव्हरवरील किमती उपकरणावर चोरट्यांनी डल्ला मारला. सुमारे 30 हजारांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 3 ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शुक्रवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रसोया प्रोटीन्स व सावर्ला येथे जिओ व इतर कंपनीचे टॉव्हर लावलेले आहे. याच्या मेन्टटन्सची जबाबदारी इंडस टॉव्हर कंपनीकडे तर सुरक्षेची जबाबदारी निसा गृप या कंपनीकडे आहे. दिनांक 3 ऑक्टोबरच्या पहाटे 4 वाजता निसा कंपनीचे पेट्रोलिंग सुपरवायझर अमोल गुजर यांना इंडस कंपनीच्या सुपरवायजरने रसोया प्रोटीन्स व सावर्ला येथील मोबाईल टॉव्हरवरचे उपकरणं चोरट्यांनी चोरल्याची माहिती दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

माहिती मिळताच दुस-या दिवशी अमोल हे घटनास्थळी गेले. त्यांना टॉव्हरवरील वीआयएल कंपनीचे तीन कार्ड ज्याची किंमत 15 हजार व जिओ कंपनीचे राउटर ज्याची किंमत 15 हजार हे उपकरण चोरी गेल्याचे आढळले. दिनांक 1 ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान हे उपकरण चोरी गेल्याचा संशय आहे. अमोल यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल केले आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.