वैरागडे गुरुजी फाउंडेशनची स्थापना

राबवण्यात येणार विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व माजी मुख्यद्यापक श्रीराम वैरागडे यांचे 6 ऑगस्ट 2021 रोजी निधन झाले होते. त्यांच्या स्मृती निमित्त त्यांच्या कुटूंबानी, मित्रांनी पुढाकार घेत श्रीराम वैरागडे गुरुजी फाउंडेशनची स्थापना केली. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाउंडेशनच्या माध्यमातन विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच या संस्थेद्वारा शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार, विद्यापीठ स्तरीय व्याख्यानमाला, पत्रकार संघाच्या माध्यमातून शैक्षणिक रेपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांसाठी पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहे. अशी माहिती फाउंडेशनचे कार्यवाहक नरेंद्र वैरागडे यांनी दिली.

Comments are closed.