उन्हाळ्याच्या सुटीत विविध प्रकारचे डान्स शिकण्याची संधी

5 - 15 वयोगटासाठी प्रवेश सुरु... प्रवेशासाठी संपर्क - 9226337137

पुरुषोत्तम नवघरे, वणी: डान्स हा प्रत्येकाचाच आवडीचा विषय असतो. याचे कारण म्हणजे इतर कलेसारखे साहित्य लागत नाही. रिदम ऐकला की आपोआप पाय थिरकायला लागतात. मग ते गणेशोत्सवाचा बँड असो किंवा डिजे. सध्या रिल्सच्या काळात तर डान्स तर अधिकच प्रसिद्ध होत आहे. नृत्याची आवड असणा-यांसाठी किंवा छंद असणा-यांसाठी आता विविध प्रकारचे डान्स शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वणीमध्ये महाराष्ट्र बँक चौक जवळ उन्हाळ्याच्या सुटीत हे क्लास असून 7 मे ते 30 जून पर्यंत हे क्लास चालणार आहे.

सदर क्लास हे 5 ते 15 वयोगटातील मुलामुलींसाठी असून क्लासचा रोजचा वेळ हा संध्याकाळी 5 ते रात्री 7 असा दोन तासांचा राहणार आहे. विविध नृत्य प्रकारात प्राविण्य असलेले डान्स मास्टर हे मुलांना प्रशिक्षण देणार आहेत. यात वेस्टर्न, फोल्क अशा विविध नृत्य प्रकारांचा समावेश राहणार आहे. महाराष्ट्र बँक चौकातील सिद्धी विनायक मॅचिंग सेंटरजवळ हा क्लास सुरु होणार असून अधिक माहितीसाठी 9226337137 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.