विवेक तोटेवार, वणी: काल रात्री उशीरा जिल्ह्यात (यवतमाळ नगरपालिका हद्द वगळून) मद्यविक्रीला सशर्त परवानगीचा आदेश काढण्यात आला. रात्री उशिरा आदेश आल्यामुळे आज केवळ एकच वाईन शॉप उघडण्यात आले. त्यामुळे वणीकरांनी दारू खरेदीसाठी एकच गर्दी केली. मद्य खरेदीसाठी लागलेली लाईनने तुटी कमानही पार केली. नंबर लागलेल्या ग्राहकांनी चांगलाच स्टॉक खरेदी करून ठेवला. मात्र या वाईन शॉपने 12 वाजल्यानंतरही बराच वेळ छुप्या मार्गाने वाईन शॉपमधून मद्यविक्री केल्याचे समोर आले आहे.
पोलीस येताच तळीरामांनी ठोकली धूम…
शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत म्हणजे 12 वाजल्या नंतर वाईन शॉप बंद करण्यात आले. यावेळी वाईन शॉपचे मालकही तिथे हजर होते. त्यांच्या समोर कर्मचाऱ्यांनी वाईन शॉप बंद केले. मालक निघून गेल्यानंतर थोडाच वेळात पुन्हा शटर लावून व आतून कर्मचाऱ्यांनी मद्य विक्री सुरू केली. याबाबत कुणीतरी पोलिसांना माहिती दिली. लवकरच पोलिसांचे वाहन येताच तळीरामांनी तेथून पळ काढला. पोलिसांची तपासणी करून आत असलेल्यांना बाहेर काढले, ताकीद दिली व कुलूप लावून बंद करण्यास सांगितले.
6 मे बुधवार पासून वणी शहरातील वाईन शॉप सुरू होणार असल्याची चर्चा होती. याकरिता वणीतील टुटी कमान व सुजाता टॉकीज जवळच्या वाईन शॉप जवळ तळीरामांनी एकाच गर्दी केली. काही वेळ सोशल डिस्टनसिंगचा ही फज्जा उडाला. परंतु पोलिसांनी दंडुकाचा प्रसाद देताच गर्दी पांगली. त्यानंतर अनेक शौकीन रांगेत येऊन मद्य विकत घेत होते. महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यात सुरू असलेलं हे एकमेव मद्यविक्रीचं दुकान ठरलं.