कु. फाल्गुनी कामडे हिची विद्यापीठ कबड्डी संघात निवड
लोकमान्य टिळक महाविद्यालयाची उंच भरारी
पुरुषोत्तम नवघरे, वणी : लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी (शिक्षण प्रसारक मंडळ संचालित) येथील बी.कॉम भाग-दोनची विद्यार्थिनी कु. फाल्गुनी गणेश कामडे हिची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कबड्डी संघात निवड झाली आहे.
येत्या 27 ते 31 ऑक्टोबरदरम्यान स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेत ती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

“लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक प्रा. उमेश व्यास यांच्या नियमित मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले,” असे फाल्गुनी कामडेने सांगितले.
या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्रजी बरडिया, सचिव सुभाषराव देशमुख, व्यवस्थापन समितीचे संचालक, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, प्रा. उमेश व्यास तसेच महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.





Comments are closed.