मुख्याध्यापक राजेश कचवे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार

भालर येथील जि.प. प्राथ. शाळेतील विद्यार्थी झाले भावूक

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील भालर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश नामदेवराव कचवे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने निरोप व सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापक कचवे बुधवार 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्य भालर केंद्राची शिक्षण परिषद आणि मुख्याध्यापक राजेश कचवे यांचे सपत्निक सत्कार करण्यात आले.

सत्कार समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती भालरचे अध्यक्ष सुधाकर मंदे हे होते. मार्गदर्शक म्हणून वणी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर आणी पाहुणे म्हणून माजी गट शिक्षण अधिकारी नवनाथ देवतळे, प्रकाश नागतुरे, विनोद नासरे, पवन धांदे तसेच शिक्षक, शाळा समिती तथा ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी राजेश कचवे यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदान बद्दल त्यांचे आभार मानले आणी त्यांचे पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक कचवे यांना निरोप देताना सर्व विद्यार्थी खूप भावूक झाले. कार्यक्रमाचा संचालन सतीश एकरे यांनी तर प्रास्ताविक पवन धांदे यांनी केले. आभार मंगेश खामनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भालर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच शा.व्य.समीतीचे सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments are closed.