निष्ठेने कार्य केल्याचे फळ कायम उत्तमच असते: गोहोकर

नायब तहसीलदार गोहोकर यांना निरोप

भास्कर राऊत मारेगाव: आपले काम ही आपली पूजा समजून निष्ठेने केले तसेच मिळालेले कार्य जर आपण नेमाने करीत राहिलो तर त्याचे अंतिम फळ हे उत्तमच असते, असे प्रतिपादन नुकतेच सेवानिवृत्त झालेले नायब तहसीलदार डी. जे. गोहोकर यांनी केले. सेवनिवृत्तीपर कार्यक्रमात सत्कार प्रसंगी बोलत होते.

मारेगाव तहसील कार्यालयात कार्यरत असलेले नायब तहसीलदार डी. जे. गोहोकर हे दि. 30 सप्टेंबरला नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यानिमित्ताने आज दि. 30 सप्टेंबरला तहसील कार्यालयात त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त नायब तहसीलदार व्ही. बी. दासरवार, निवृत्त मंडळ अधिकारी के.एस.भगत उपस्थित होते.

यावेळी डी. जे.गोहोकर यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना डी. जे. गोहोकर यांचा कंठ दाटून आला होता. 2017 मध्ये मारेगाव येथे नायब तहसिलदार म्हणून रुजू झालेले गोहोकर यांनी आपला पूर्णवेळ देत योग्य सेवा दिली.

त्यांची काम करण्याची हातोटी, वेळेचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांवर असलेला वचक तसेच सुस्वभाव यामुळे ते अल्पावधीतच सर्वांच्या परिचयाचे झाले होते. आधीच कर्मचारी आणि अधिकारी पदे कमी असलेल्या तहसील कार्यालयातील कामाचा ताण यांच्या निवृत्तीमुळे पुन्हा वाढणार यात संशय नाही.

हे देखील वाचा:

गुलाब वादळाने उसाला झोपविले, शेतक-याचे नुकसान

गुरुनगर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Comments are closed.