दीड दिवसाच्या गणपतीला भावपूर्ण निरोप

यंदा निर्माल्य कलश व विसर्जन टाकी गायब

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी मोठया थाटामाटात घराघरात गणपतीची स्थापना करण्यात आली. काही भक्तांच्या घरी दीड दिवसाचा काहींच्या घरी 5 दिवसाचा तर काही भक्तांच्या घरी 10 दिवसांच्या गणपतीची स्थापना करण्यात आली. शनिवारी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. या वर्षीही कोरोनामुळे निर्बंध असल्याने वाजत गाजत जरी बाप्पाचे विसर्जन नसले तरी त्याच उत्साहात भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला भक्तांनी निरोप दिला.

शनिवारी 1 सप्टेंबर रोजी लाडक्या गणेशाला निरोप देण्यात आला. वणीत गणेशपूर घाट व बांधाजवळील घाटावर विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात भक्तांनी आपल्या लाडक्या दैवताला निरोप दिला. मात्र यंदा विसर्जन स्थळी नगर परिषदेकडून निर्माल्य कलश व गणपती विसर्जित करण्याकरिता ‘इको फ्रेंडली गणेश विसर्जन’ करण्याची व्यवस्थेचा अभाव असल्याचे दिसून आले.

यंदा निर्माल्य कलश व विसर्जन टाकी गायब
गेल्या वर्षी वणीची जीवनदायी निर्गुडा प्रदूषित होऊ नये म्हणून नगर पालिकेतर्फे निर्माल्य कलश व इको फ्रेंडली विसर्जन टाके विसर्जनाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. परंतु यावर्षी वणी नगर पालिकेकडून निर्माल्य विसर्जित करण्याकरिता निर्माल्य कलश ठेवण्यात आले नाही. गेल्या वर्षी इको फ्रेंडली विसर्जन टाक्याला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र यावर्षी विसर्जन टाके नसल्याने भाविकांनी नदी पात्रातच विसर्जन केले.

गणेशपूर येथे विसर्जनकरिता नदीपात्रात उतरण्याकरिता पायऱ्या बनविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र हे अर्धवट काम असल्याचे दिसून येत आहे. यानंतर 5 दिवसांचे व 10 दिवसांचे गणेश विसर्जन आहे. यासाठी नगर पालिका काय व्यवस्था करते याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा:

मारेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, नदीकाठावरील शेत पुराखाली

गणेशोत्सव ऑफर: सोलर झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च मोफत

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!