सुशील ओझा, झरी: प्रहारचे जिल्हाध्यक्ष विलास पवार व केळापूर विधानसभा अध्यक्ष अजय घोडाम यांनी तालुक्यातील आदिवासी लोकांची समस्या लक्षात घेत ग्रामपंचायत हिवराबारसा, अंतर्गत कटली बोरगांव, पालगांव, बोटोनी, पार्डी येथील शेतकरी, शेतमजूर आदिवासी बांधवांच्या शेतजमीनीचे पट्टे मिळण्याकरीता ग्रामस्थांना भेटी घेउन तेथील समस्या जाणून घेतल्या व शेतकरी, शेतमजूर आदिवासी बाधवांच्या शेतजमीनीचे पट्टे विषय ग्रामपंचायीतचा ठराव घेउन जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले.
शेतजमीन पट्टे संदर्भातजिल्हा अधिकारी यांनी १ महीन्याचा कालावधि मागुन सर्व जमिनीचे विषय निकाली काढु अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शब्द दिला. तालुक्यातील आदिवासी जनतेच्या जमिनिचे पट्टे निकाली लावले नाहीत तर तीव्र आंन्दोलन करु असे प्रहार जन शक्ती पक्षाचे आर्णि-केळापुर विधानसभा प्रमुख अजय घोडाम यांनी सांगितले.
त्यावेळी पिंन्टु दांडगे आशिष तुपटकर, रूपेश सरडे, तुषार भोयर, कैलास आत्राम, तसेच सर्व अतिक्रमण धारक शेतकरी हिवराबाजार, पालगांव, कटली बोरगांव, पार्डी, बोटोनी येथील शेतकरी, शेतमजूर आदिवासी बांधव उपस्थित होते.