तरुण शेतक-याची विष प्राशन करून आत्महत्या

शेतात घेतला विषाचा प्याला...

बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या बोपापूर येथील एक तरुण शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केली. रविवार, दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. गजानन लक्ष्मण चिकराम (वय 35) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. या घटनेची मुकुटबन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गजानन हे बोपापूर येथे कुटुंबासह राहत होते. रविवारी ते शेतात गेले होते. तिथे त्यांनीविषारी द्रव्य प्राशन केले. दरम्यान जवळच्या शेतातील लोकांना ही बाब कळली. त्यांनी गजाननच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. गजानन यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण समजलेले नाही, पण नैराश्याला जबाबदार धरले जात आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वणी तालुक्यासह उपविभागात आत्महत्या वाढत असून, तरुणांपासून गृहस्थांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत याचा प्रभाव दिसतो. एकापाठोपाठ होणाऱ्या आत्महत्यांनी चिंता वाढली आहे. प्रशासनाने आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. पुढील तपास मुकुटबन पोलिसांकडून सुरू आहे

Comments are closed.