बहुगुणी डेस्क, वणी: कायर येथील शेतक-याचा शेताच्या कम्पाउंडला असलेल्या जिवंत तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास बाबापूर शिवारात ही घटना घडली. लक्ष्मण विश्वनाथ सोनुले (65) असे मृत शेतक-याचे नाव आहे. ते कायर येथे राहात होते. त्यांची बाबापूर रोडवर शेती आहे. संध्याकाळी ते शेतात राहत होते. सध्या त्यांच्या शेतात कपाशीच्या पिकाला पाणी देणे सुरू होते. मंगळवारी संध्याकाळी ते शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. सकाळी शेळ्या चराईसाठी नेणारा माणूस शेतात गेले असता त्यांना शेतात सोनुले दिसले नाही. त्यामुळे त्यांनी सोनुले यांचा शोध घेतला असता त्यांना सोनुले हे बाजूला असलेल्या शेतामध्ये कुंपणाजवळ मृत अवस्थेत आढळून आले. विद्युत प्रवाहाचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला, असा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच, गावकऱ्यांनी व पोलीस पाटलांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.