वणी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषन

लोकप्रतिनिधींनी कार्यालयात येऊनही भेट न दिल्याने संतप्त प्रतिक्रिया

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला व वारसदारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी, वणी तालुक्यातील मौजा बेलोरा,बेलसनी, कुंभारी (रिट) येथील प्रकल्प ग्रस्त शेतकरी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे आमरण उपोषनाला बसले आहेत. उपोषनाच्या पहिल्या दिवशी त्यांना अनेकांनी भेटी दिल्या. मात्र मतदार संघातील प्रकल्पग्रस्ताचे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असताना केन्द्रीय मंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले. पण त्यांनी आपल्या मतदार क्षेत्रातील प्रकल्पग्रस्ताच्या न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषण मंडपाला भेट न दिल्याने उपोषणकर्ते नाराज झाले.

तीन गावातील प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना वे.को.ली. प्रशासनाकडुन अनेक दिवसांपासून अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवानी दि. १३ ऑक्टोबरला लेखी निवेदनाद्धारे मा. जिल्हाधिकारी यवतमाळ, मुख्य महाप्रबंधक वे.को.ली. उर्जाग्राम ताडाळी, तसेच इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना निवेदन सादर केले, परंतु संबधित प्रशासनाने त्यांच्या निवेदकाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे प्रकल्प ग्रस्त शॆतकरी संतप्त होऊन उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

वे.को.ली. मध्ये गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा मोबदला व कुटुंबातील वारसदारांना नोकरी मिळावी ही प्रकल्पग्रस्ताची प्रमुख मागणी आहे. पण प्रशासनाने मागणींची दखल न घेतल्याने शिवराम रूषी बरडे, प्रविण रोगे, चंद्रकांत. पिंपळकर, सुरेश भोगळे, विशाल वासेकर, ज्योती लोहकरे, मीना गावंडे, सतिश पिदुरकर, नितेश भोंगळे, रुपेश पोतराजे आदी प्रकल्प ग्रस्त शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत.

उपोषणाच्या पहिल्या दिवशी त्यांची कम्युनिष्ट पक्षाचे कॉ. अनिल घाटे , ओबीसी परिषदचे प्रवीण खानझोडे व मेंढोलीचे सरपंच रुपेश ठाकरे यांनी भेट घेत उपोषणाला आपला पाठिंबा जाहिर केला. लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊनही उपोषण कर्त्यांची भेट न घेतल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जनतेच्या समस्येकडे जर लोकप्रतिनिधी लक्ष देत नसेल तर असे लोकप्रतिनिधी जनतेच्या कोणत्या कामाचे असी प्रतिक्रिया उपोषनाला बसलेल्या उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.