नवरगाव येथील शेतक-याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

उपचारादरम्यान मृत्यू, सततच्या आत्महत्येमुळे तालुका हादरला

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील नवरगाव येथील एका शेतक-याने सोमवारी संध्याळच्या सुमारास कीटकनाशक प्राशन केले होते. मात्र आज पहाटेच्या सुमारास सदर शेतक-याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रमेश विठ्ठल तिखट (50) असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव आहे. तालुक्यातील या आठवड्यातील ही चौथी आत्महत्या आहे. सातत्याने होणा-या आत्महत्येमुळे तालुका हादरला आहे. 

मृतक रमेश हे नवरगाव येथील रहिवाशी होते. ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. सोमवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांनी आपल्या राहात्या घरी कुणी नसल्याची संधी साधून कीटकनाशक प्राशन केले. काही वेळाने ही गोष्ट त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांना वणी येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चंद्रपूर येथे त्यांच्यावर रात्रीपासून उपचार सुरू होता. मात्र पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रमेश यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. मृतकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुली, जावई, नातवंडे असा आप्त परिवार आहे. गेल्या चार दिवसांमध्ये ही चौथी आत्महत्याची घटना आहे. सातत्याने होणा-या आत्महत्येमुळे तालुका हादरला आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.