तालुक्यात एकाच दिवशी 2 शेतक-याची आत्महत्या

एकाची विष प्राषन करून तर दुस-याची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात बुधवारी दिनांक 22 नोव्हेंबर रेजी एकाच दिव़शी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या. शिरपूर ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बाबापूर व डोर्ली या गावात ही घटना घडली. प्रशांत अण्णाजी निब्रड (47) रा. बाबापूर व निखिल विठ्ठल टोंगे (30) रा. डोर्ली असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहे. 

 तालुक्यातील बाबापूर येथे राहणाऱ्या प्रशांत अण्णाजी निब्रड (47) या शेतकऱ्याने आपल्या शेतातच विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. सकाळी शेतात गेलेला प्रशांत घरी न आल्याने कुटूंबियांना शेतात जाऊन बघितले असता प्रशांत हा शेतातच मृतावस्थेत पडलेला दिसून आला.

कुटूंबियांनी याबाबतची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. प्रशांतच्या मागे आई वडील, पत्नी दोन मुले असा मोठा आप्तपरिवर आहे. 

निखिल टोंगे यांनी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. निखिल हा रोजमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. दुपारच्या सुमारास घरी कुणी नसल्याची संधी साधून त्याने हे पाऊल उचलले. त्यांच्या मागे आई वडील व भाऊ असा आप्तपरिवार आहे. दोन्ही घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे. एकाच दिवशी दोन आत्महत्या झाल्याने दोन्ही गावात शोककळा पसरली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.