शेतकरी व नागरीकांना शासनाने मदत करावी

झरी पं. स. सभापती राजेश्वर गोंड्रावार यांची मागणी

0

सुशील ओझा, झरी: असमानी आणि सुलतानी संकंटांनी ग्रस्त शेतकरी नि नागरिकांना शासनाने मदत करावी. यांसह अनेक विषयांवर पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी तहसीलदार गिरीश जोशी ह्यांचाशी चर्चा केली.

तालुक्यातील बिटीच्या कपाशीवर बोंडअळी आली. तसेच सोयाबिनचे प्लॉटचे प्लॉट उद्ध्वस्त झालेत. शेतकऱ्यांना १००% पिकविमा मिळायला पाहीजे. शासनाने शेतकऱ्यांना झालेली नुकसान भरपाई दिली पाहीजे. कारण शेतकरी वर्ग खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.

तो द्विधा मनस्थितीत असल्यामुळे त्याची हिमंत खचत आहे. त्यांना शासनस्तरावरून लवकरात लवकर नुकसान भरपाई त्वरीत देण्यात यावी. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात यावे. तसेच झरीजामणी तालुक्यातील गोरगरिब कुटुंबातून नवीन लग्न होऊन बाहेर पडलेल्या नवीन जोडप्यांना राशनकार्ड त्यांच्या नावाने उपलब्ध करून देण्यात यावे.

तसेच निराधार योजना, श्रावणबाळ योजना व कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थ्यांचे अर्ज लवकरात लवकर मंजूर करून त्यांना त्यांचा लाभ देण्यात यावा.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.