आवास योजनेच्या अनुदानासाठी उपोषण सुरू

दुसरा हप्ता न मिळाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर

0

सुशील ओझा, झरी: घरकुल योजनेचे हप्ते अद्याप न मिळाल्याने झरी येथील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. कालिदास अरके, गजानन मडावी,राजू शेख व पिंटू सोळंकी यांनी स्थानिक बस स्टँड चौकात उपोषण सुरू केले आहे.

नगरपंचायत अंतर्गत झरी येथील ३६ लोकांना दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर करण्यात आले. आवास योजनेतर्फे बांधकामाची परवानगी सुद्धा नगरपंचायततर्फे देण्यात आली. त्यानुसार बहुतांश लोकांनी बांधकाम सुरू केले. शासनाकडून बांधकामाचा पहिला टप्पा 40 हजार देण्यात आले. घरकुल लाभार्थी यांनी स्लॅब लेव्हल पर्यंत घरकुल बांधकाम केले. परंतु शासनाकडून दुसरा हप्ता न मिळाल्याने घराचे स्लॅब अद्याप पडलेले नाही. त्यामुळे अनेकांना उघड्यावर रहावे लागत आहे. काही लाभार्थी भाड्याच्या घरात राहून आपले जीवन व्यथित करीत आहे.

पावसाळा सुरू असल्यामुळे उघड्यावर राहणाऱ्या लाभार्थीचे सर्प, विंचू इतर जलचर प्राण्यामुळे कुटुंबासह लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेजवळ काम नसल्याने घराचे भाडे देने कठीण झाले आहे. घरभाडे द्यायचे कुठून व जगायचे कसे असा गंभीर प्रश्नसुद्धा घरकुल लाभार्थी पुढे थाटला आहे. घरकुल लाभार्थ्यांनी दुसरा हप्ता मिळावे या करिता यापूर्वी उपोषण केले होते. उपोषणा दरम्यान समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही हप्ता देण्यात आलेला नाही.

झरी नागरपंच्यात अंतर्गत वॉर्ड क्र १७ मध्ये ९ घरकुल ४ मध्ये ३,५ मध्ये २, १६ मध्ये ४,१३ मध्ये २ व १२ मध्ये ३ घरकुल मंजूर असून हे सर्व लाभार्थी बांधकामाचा दुसरा हप्ता न मिळाल्याने त्रस्त झाले आहे. घरकुल लाभार्थी यांनी तीन वेळा जिल्हाधिकारी व नगरपंचायतचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना तक्रार देऊनही कोणताच उपयोग झाले नाही. त्यामुऴे अखेर लाभार्थ्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरपंचायतमध्ये अध्यक्षसह १७ नगरसेवक असून आजूनपर्यंत कोणीही घरकुल लाभार्थ्यांकडे लक्ष देत नसून स्वतःच्या कामात खुश असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही घरकुल लाभार्थी यांनी शासनाचे पैसे मिळणारच या आशेने स्वतःजवळील असलेला पैसा खर्च करून बसल्यामुळे त्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.