बापलेकाची मोठ्या मुलाला लोखंडी गजाने मारहाण

घराच्या वादातून घटना... बापलेकांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: घराच्या वादातून भाऊ व बापाने मुलाला लोखंडी गजाने मारहाण केली. शनिवारी सकाळी वणी-यवतमाळ रोडवर साई मंदिराजवळ ही घटना घडली. यात मुलगा जखमी झाला. या प्रकरणी मुलाने आपल्या वडीलांविरोधात व लहान भावाविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणा-या बापलेकावर गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, जुल्फोद्दीन नासीरुद्दीन शेख (39) हा दामले फैल वणी येथील रहिवासी असून तो त्याच्या कुटुंबीयांसह राहतो. तो यवतमाळ रोडवरील कमल इलेक्ट्रॉनिक्स समोरील फुटपाथवर फर्निचरचे दुकान चालवतो. त्याच्या दुकानाच्या बाजुलाच फुटपाथवर त्याचे वडील नासिरुद्दीन (70) व त्याचा लहान भाऊ नदीमोद्दीन नासिरुद्दीन शेख (24) याचे फर्निचरचे दुकान आहे. जुल्फोद्दीन याचा त्याचे वडील व लहान भावासोबत घरावरून वाद आहे. ते दोघेही जुल्फोद्दीनला घराबाहेर काढण्याची धमकी देतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शनिवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास जुल्फोद्दीन दुकानात होता. दरम्यान त्याचे वडील व लहान भाऊ दुकानात आले. त्यांनी दुकानातील सामान सरकवण्यास सुरुवात केली. त्यावर जुल्फोद्दीनने त्यांना असे करण्यास मज्जाव केला. यावरून वाद वाढला व त्याच्या वडीलांनी बाजूला पडलेल्या लोखंडी गजाने हल्ला केला. तर लहान भावाने शिविगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत जुल्फोद्दीनचा हात फ्रॅक्चर झाला. तसेच दोघांनीही त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या जुल्फोद्दीनने पोलीस स्टेशन गाठत वडील व लहान भावाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी बापलेकावर बीएनएसच्या कलम 115(2), 117(2), 3(5), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

ट्रकची दुचाकीला मागून धडक, तरुण जागीच ठार

नव-याने घातला बायकोच्या डोक्यात वरवंटा, पत्नी जखमी

Comments are closed.