विवेक तोटेवार, वणी: घरासमोर वाद घालणाऱ्या बापलेकांना हटकले. त्यामुळे राग धरून एका तरुणाला बापलेकांनी लाकडी दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला. शहरातील खडबडा मोहल्ला येथे दिनांक 10 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत युवकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बापलेकांवर गुन्हा दाखल केला आहे.
रूपेश ज्योतीराम किनाके (28) हा खरबडा मोहल्ला येथे परिवारासह राहतो. त्याच्या शेजारी गेडाम कुटुंब वास्तव्यास आहे. मंगळवारी दिनांक 10 डिसेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास रुपेश हा घरी जात होता. दरम्यान विजय भारत गेडाम (25) व भारत गेडाम (50) हे पितापुत्र रूपेशच्या घरासमोर वाद घालत होते. यावरून रूपेशने त्या दोघांनाही घरासमोर वाद कशाला घालता, असे म्हटले म्हटले. बापलेकांनी त्यांचा राग रुपेश त्याच्यावर काढला.
भारत गेडाम याने रुपेशचे हात पकडून ठेवले व विजय गेडाम याने हातातील लाकडी दांडा रुपेशच्या नाकावर मारला. मारहाणीत रुपेशच्या नाकाला जबर दुखापत झाली. याबाबत रुपेशने बापलेकांविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारत गेडाम व विजय गेडाम या दोघांवर बीएनएसच्या कलम 118 (1), 3 (5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.