गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

विविध शिष्यवृत्तीसंबंधी देण्यात आली विद्यार्थ्यांना माहिती

0

विलास नरांजे, वणी: भारतीय बौध्द महासभा, तालुका वणीच्या वतीने गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुरुवारी भीमनगर येथील महाबोधी बुध्द विहारात मिलिंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणुन रवी भगत जिल्हाध्यक्ष बौध्द महासभा, समाज कल्याण अधिकारी मंगला मुन, पीएसआय जयप्रकाश निर्मल, राजू निमसटकर, देवानंद वानखेडे, भगवान इंगळे उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

उपस्थित मान्यवरांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्त्यांची माहीती देत, पुढील शैक्षणिक जीवना करीता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचलन रमेश तेलंग यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या आणि भारीपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.