विवेक तोटेवार, वणी; तालुक्यातील रासा येथील कृषी केंद्र चालकाच्या तक्रारीवरून 21 जून रोजी खताच्या बॅगा चोरी गेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या शोधत होते. लगेचच एका दिवसात वणी पोलिसांनी आरोपीला जेरेबंफ केले आहे.
रासा येथे उल्हास सत्यनारायण वरारकर यांचे कृषी केंद्र आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने खताच्या बॅग त्यांनी आपल्या गोदामात ठेवल्या होत्या. हळूहळू रासायनिक खतांच्या बॅग कमी होत असल्याचे सत्यनारायण यांच्या लक्षात आले. 21 जून रोजी गोदांचे कुलूप उघडे दिसले. त्या ठिकाणी 45 खताच्या बॅग कमी आढळल्या.त्यांनी त्वरित वणी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले. शोध घेत असताना त्यांनी आरोपी विनोद शामराव सूर (30) व सचिन विनायक आत्राम (25) याना अटक केली. विचारपूस केली असताना त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून खताच्या 45 बॅग किंमत 46395 जप्त करण्यात आल्या. आरोपीवर कलम 461, 380 भा द वि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार धर्मेंद्र देमाजी आळे , सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अजय शेंडे, नितीन सलाम, सुदर्शन वनोळे यांनी केली.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post